
माती परीक्षण करण्यासाठी माती नमुना केव्हा व कोठे घ्यावा
मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी घ्यावा..तसेच शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा
मातीचा नमुना कुठे घेऊ नये?
1) गुरे बसण्याची व झाडाखालची जागा
2) खते व कचरा टाकण्याची जागा
3) दलदल व घराजवळची जागा
4) बांधजवळचे क्षेत्र
5) झाडाझुडुपांचे क्षेत्र
6) जमिनीत रासायनिक खते टाकली असल्यास दोन अडीच महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये
मातीचा नमुना कसा घ्यावा?
1) आपण निवडलेल्या शेतामध्ये झिक झ्याक पद्धतीने ठिकाण निवडावेत
2) इंग्रजी v आकाराचा 22 ते 30 सेमी खड्डा खोदावा व त्या खड्यातील माती बाहेर काढून टाकावी आणि मग खड्याच्या कडेची माती घ्यावी
3) गोळा केलेल्या मातीचा ढीग करावा,त्या ढिगाचे चार भाग करून समोरासमोरील माती काढून टाकावी हीच प्रक्रिया माती अर्धा किलो राहील तो पर्यंत करावी
4) फळबाग लागवडीसाठी 1 मिटरचा खड्डा घ्यावा,प्रत्येक 30 सेमी खोलीसाठी वेगळा नमुना घ्या
(माती नमुना घेण्यासाठी लोखंडी हत्यार वापरू नये)
माती नमुना प्रयोगशाळेला कसा पाठवावा?
1) माती नमुना हा कापडी पिशवीत घ्यावा, त्या पिशवी मध्ये शेतकऱ्याचे न ाव,गट न ,संपूर्ण पत्ता,नमुना घेतल्याची तारीख, शेताचे क्षेत्र, बागायत, जिरायत, मागील हंगामातील पीक, पुढील हंगामाचे नियोजन, जमिनीचे काही विशेष लक्षणे, इत्यादी माहिती भरून कापडी पिशवीला लावून द्यावी.
मातीची तपासणी का करावी?
आपल्या मातीचे आरोग्य कसे आहे हे समजून घेण्यासाठी माती परीक्षण करावे, त्यामध्ये प्रामुख्याने आपणास
1) जमिनीचा सामू PH
2) क्षारता EC
3) मुख्य अन्न घटक-सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश
4) सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती
या गोष्टींची माहिती मिळते