top of page
Search

वेळीच ओळखा टोमॅटो मधील विकृती

योगेश भगुरे ,९९२२४१४८७३

सहायक प्राध्यापक ,उद्यानविद्या विभाग ,के.डी.एस.पी कृषि महाविद्यालय ,नाशिक


भाजीपाला पिके ही इतर पिकांच्या तुलनेत नाजूक असतात, त्यामुळे वातावरणातील बदल, अन्नद्रव्याची कमतरता इ. बाबींमुळे पिके शारीरिक विकृतीला बळी पडतात. शारीरिक विकृती ही वातावरणातील बदल जसे जास्त तापमान ,कमी तापमान , जास्त पाऊस किंवा पावसाचा खंड ,अन्नद्रवयांची कमतरता , जमीनीतील कमी - जास्त ओल इ कारणांमुळे होते. काही वेळा रोग - किडींचा प्रादुर्भाव व शारीरिक विकृती यांची लक्षणे ओळखण्यात शेतकरी बंधूंना अडचणीचे ठरते ,त्यामुळे फवारणीवरील खर्च वाढतो परंतु समस्येवेवर नियंत्रण मिळत नाही म्हणून भाजीपाला पिकांतील शारीरिक विकृती वेळीच ओळखून त्यांचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे.

१.फळ तडकने (फ्रूट क्राकींग)-

फळ तडकने ही टोमॅटो पिकातील जास्त प्रमाणात आढळून येणारी विकृती आहे . फळ पक्वतेच्या अवस्थेत जास्त ऊन , अचानक जास्त पाऊस किंवा जास्त पाणी देणे यामुळे जमिनीतील ओळव्यात मोठ्या प्रमानात बदल होऊन फळ तडकते, तसेच बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता,आनुवंशिक गुणधर्म इ. कारणांमुळे ही समस्या दिसून येते .

उपाय - जमिनीचे मातिपरिक्षण करून त्या आधारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे .

प्रतिकारक्षम जातींचा लागवडीसाठी उपयोग करावा .

लागवडीसाठी गादीवाफा व ठिबक सिंचन यांचा वापर करावा .

पाणी नियोजन योग्य प्रकारे करावे .

बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा गरजेनुसार जमिनीद्वारे व फवारनीद्वारे वापर करावा .



२. कळीच्या शेवटी सडणे (ब्लोझम एंड रोट)-

या विकृतीमध्ये सुरवातीच्या काळात फळाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगाचा ठिपका दिसून येतो ,नंतर ठिपका मोठा होऊन तो भाग कुजतो . अशी फळे विक्री योग्य राहत नाही .कैल्शियम च्या कमतरता या विकृतीस कारणीभूत ठरते .

उपाय - खतांचा संतुलित वापर करावा

गरजेनुसार चिलेटेड कैल्शियम ०.५ ते १ ग्राम किंवा कैल्शियम क्लोराइड 2-2.5 ग्राम प्रती १ ली पाण्यातून फवारणी करावी .



३. फळांवर चट्टे पडणे -

टोमॅटो फळांच्या उन्हाकडील बाजूवर जास्त उन्हामुळे पांढरट चट्टे पडतात, नंतर तो भाग सुकतो .अशा फळांना बाजारात कमी भाव मिळतो .

उपाय - लागवडीसाठी जास्त फांद्या व दाट पाने असलेल्या जातींची निवड करावी .

बांधणी करताना फळे सावलीत राहतील अशाप्रकारे बांधणी करावी .

कीड व रोगांचा वेळीच बंदोबस्त करावा म्हणजे पानगळ होणार नाही .



४. फळ पोकळ पडणे (पफीनेस) -

यामध्ये फळाची बाहेरून वाढ ही सामान्य असते परंतु फळ मध्ये पोकळ असते ,गर कमी असतो,अशी फळे वजनाला हलकी असतात . जास्त तापमान, योग्यप्रकारे परगिभवण न होणे इ. कारणांमुळे ही समस्या येते . यामुळे एकूण उत्पादनात घट येते .

उपाय - खतांचा संतुलित वापर करावा

अतिरिक्त पाणी देणे टाळावे .



५. कैटफेस -

या विकृती मध्ये फळांचा आकार मांजरीच्या तोंडासारखा होतो, अशा फळांना बाजारात भाव कमी मिळतो.

फुले लागण्याचे अवस्थेत थंड व ढगाळ वातावरण असेल तर ही समस्या दिसून येते .

उपाय -

स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर ह्या विकृतीचे नियंत्रण होते .



६.ब्लौची रायपेनिंग -

या विकृती मध्ये फळे परिपक्व होत असताना आकर्षक लाल रंग न येता फळे हिरवट पांढरी व लालसर दिसतात त्यामुळे शेतकरी बंधु याला तिरंगा नावाने संबोधतात . अशा फळांना बाजारभाव कमी मिळतो .ढगाळ ,थंड , धुके असलेले वातावरण,रिमझिम पाऊस इ. कारणांनामुळे ही विकृती दिसून येते .

उपाय -

सहनशील जातीचा लागवडीसाठी वापर करावा .

माती परीक्षणांनुसार अन्नद्रव्यंचा संतुलित वापर करावा . नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा .



योगेश भगुरे ,९९२२४१४८७३

सहायक प्राध्यापक ,उद्यानविद्या विभाग ,के.डी.एस.पी कृषि महाविद्यालय ,नाशिक


 
 
 

Comments


Back To Home
Waiting Room

Corporate Office

Tropical Agrosystem (I) Pvt.Ltd.

Office No. 309/310

Mahalakshmi Market, Market Yard,

Krushi  Utpana Bazar Samite

Gultekadi, Pune - 411034 

Customer Care For Maharashtra

Rahul Vadghule : 9881135140

Copyright by Rahul Vadghule
  • YouTube

Find us on 

bottom of page